आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव ‘धार्मिक’ नव्हे तर ‘सामाजिक उत्सव’ : फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ब्रिटिशांच्या  दडपशाहीने विजिगीषू वृत्ती विसरलेल्या तत्कालीन समाजाला लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला ‘धार्मिक’ रूपातून ‘सामाजिक’ उत्सवाचे रूप देऊन जागृत केले. टिळकांनी या उत्सवाच्या  रूपाने अभूतपूर्व असे सामाजिक अभिसरण घडवले. तो उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत असताना सुराज्यासाठी या उत्सवाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
  
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या  प्रांगणात पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित  कार्यक्रमात फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी उपक्रमांंचे उद््घाटन केले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे यांच्यासह आमदार, नगरसेवक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या  खास शुभंकरचे, बोधचिन्हाचे उद््घाटनही याप्रसंगी झाले.   
बातम्या आणखी आहेत...