आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँग्स ऑफ वास्सेपूरचे दोन भाग एकत्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय सिनेमांच्या इतिहासात प्रथमच ‘गँग्स ऑफ वास्सेपूर’चे दोन भाग एकामागोमाग एक पाहण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे. येत्या 8 ऑगस्टला भारतातील मोठ्या शहरांत काही निवडक थिएटर्समध्ये ‘गँग्स ऑफ वास्सेपूर’चा बॅक टू बॅक शो आयोजित करण्यात आला आहे.
‘गँग्स ऑफ वास्सेपूर’ चा पहिला भाग 22 जूनला प्रदर्शित झाला आणि त्याला तिकीटबारीवर चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच पडद्यावर आलेल्या दुस-या भागालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे लोकप्रियतेच्या जोरावर आता ‘वस्सेपूर’च्या टीमने दोन्ही भाग एकाच वेळी पुन्हा दाखवून प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याआधी ‘गॉडफादर’ या हॉलीवूडपटाच्या सिरीज एकापाठोपाठ एक दाखवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. टेलिव्हिजन क्षेत्रात मालिकांचे एपिसोड्स सलग दाखवले गेले, त्यानंतर एकाच दिवशी एखादा लोकप्रिय चित्रपट चॅनलवर दोनदा दाखवले गेले मात्र भारतीय सिनेमांच्या इतिहासात प्रथमच थिएटरमध्ये असा धाडसी प्रयोग करण्याचा मान 'गँग्स ऑफ वस्सेपूर’ला जातो.
15 मिनिटांच्या ब्रेकसह 'गँग्स ऑफ वास्सेपूर'चे दोन्ही भाग मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चंडीगढ, बंगळुरू, हैदराबाद, पुणे अशा महत्वाच्या शहरांमधील थिएटरवर दाखवण्यात येणार आहेत. यातून आता बॉलीवूमध्ये ‘बॅक टू बॅक’ नवा ट्रेंड सुरू झाला असल्याची चर्चाही चित्रपटसृष्टीत रंगली आहे.