आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोलिस चौकीसमोरच कुख्यात गुंड पप्पू सातपुतेची हत्या; काही दिवसांपासून होता तडीपार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुळशी तालुक्यातील कुख्यात गुंड पप्पू सातपुते याचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेेष म्हणजे कोळवण येथील पोलिस चौकीसमोर काल (गुरुवारी) रात्री आठच्या सुमारास हे हत्याकांड घडले.
 
काय आहे हे प्रकरण?
- सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते  (रा. अकोले, वय 25) असे मयताचे नाव आहे.
- काल (गुरुवारी) रात्री पप्पू मित्रासोबत असताना त्याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी त्याच्यासोबत असलेला मित्र रवींद्र सातपुते जखमी झाला आहे.
- याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मुळशी परिसरात होती पप्पूची दहशत..
- पप्पू सातपुते हा मुळशी परिसरातील कुख्यात गुंड होता.
- गुंडगिरीच्या स्वभावामुळे त्याला मुळशीच्या भागात पप्पू नावाने ओळखले जाऊ लागले होते.
- त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे गुन्हे दाखल होते आणि याप्रकरणात त्याला काही दिवसांपूर्वी तडीपर करण्यात आले होते.
- कोळवण परिसरात त्याचे यापूर्वी काही तरुणांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
बातम्या आणखी आहेत...