आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : पुण्यातील विसर्जन मिरवणूक समाप्त, लाडक्या बाप्पाला दिला भक्तिभावाने निरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लाडक्‍या गणरायाला पुण्‍यनगरीने भक्तीभावाने निरोप दिला. गणपती बाप्‍पांची विसर्जन मिरवणूक आज समाप्‍त झाली. दुपारी 1.30 वाजताच्‍या सुमारास अखेरच्‍या सार्वजनिक गणेशाचे विसर्जन झाले. बिब्‍वेवाडीच्‍या ज्‍वाला मित्र मंडळाचा गणपतीचे सर्वात शेवटी विसर्जन करण्‍यात आले. विसर्जन मिरवणूक अंतिम टप्‍प्‍यात आली असताना पोलिसांनी मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांना घाई केली. कार्यकर्त्‍यांनी नाराजी व्‍यक्त केल्‍यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्‍यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. मिरवणूक संपल्‍यानंतर सर्व रस्‍ते टप्‍प्‍याटप्‍प्‍याने वाहतुकीसाठी खुले करण्‍यात आले.

पाहा पुण्यातील दुसर्‍या दिवशीचे विसर्जन मिरवणुकीचे फोटो...