आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारती समोरच कचरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

पुणे- स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असंच म्हणावं लागेल.कारण स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून,अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र पालिकेसमोरील चित्र पाहता शहर स्वच्छ झालंय का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून कचऱ्याची समस्या आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरच कचरा कुंडी शेजारी कचरा साचलेला दिसत असून वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छतेचा नावाने केवळ बोभाटा केला जात आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविले जात आहे.लाखो रुपये खर्च करून महापालिकेने ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या जात आहेत.मात्र, या कचरा कुंड्या भरून वाहत असून कचरा जमिनीवर पडलेला आहे. हेच चित्र आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारती समोर पाहायला मिळाले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.तरीही महापालिकेचा स्वच्छता विभाग दररोज कुंड्यातील कचरा उचलत नाही. त्यामुळे कुंड्या शेजारील कचरा हा त्याच ठिकाणी अस्तव्यस्त पडलेला दिसून येत आहे.

 

अनेक वेळा पिंपरी चिंचवड महापालिकेवर कचऱ्याच्या समस्येतून आंदोलन झाली आहेत. शहरातील कचरा साफ होत नसल्याने, मनसेने थेट महापालिकेत कचरा आणून फेकला होता. शहराला दोन वर्षांपूर्वी केंद्राचा क्लीन सिटीचा पुरस्कार मिळाला होता. मात्र भाजपच्या सत्तेत ही ओळख पुसली गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. तसेच पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात कचरा उचलला जात नसल्याने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर 'कचरा फेको' आंदोलन केले.यापूर्वी केले गेले आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...