आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Backery Blast Case:for Money Use Friend's Atm Card Beg

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण : पैशासाठी मित्राचे एटीएम कार्ड वापरले बेग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप मिर्झा हिमायत बेग हा आर्थिक व्यवहारासाठी त्याच्या बीडमधील मित्राचे स्टेट बॅँक ऑफ हैदराबादचे एटीएम कार्ड वापरत असल्याचे खुद्द त्यानेच मंगळवारी न्यायालयासमोर कबूल केले आहे. विशेष न्यायाधीश एन.पी. धोटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून न्यायाधीशांनी आजही बेगकडे 130 प्रश्नांची विचारणा केली. मात्र ‘सब झूठ है’ म्हणत त्याने उत्तर देणे टाळले.
बेग कोलंबोहून परतल्यानंतर या बॅँक खात्यावर 73 हजार रुपये व 20 जानेवारी 2010 रोजी 30 हजार रुपये जमा झाले होते. याबाबत न्यायाधीशांनी विचारले असता, काहीच माहिती नसल्याचे बेग म्हणाला. औरंगाबाद, बीड, जालना व उदगीर या ठिकाणच्या बॅँक अधिका-यांनी हे खाते बेगच्या मित्राचेच असल्याचे पोलिसांना तपासाच्या वेळी सांगितले आहे. एटीएसने बेगच्या बीडमधील मित्राकडून त्याच्या दोन बॅग जप्त केल्या आहेत. या बॅग आपल्याच असल्याचे बेगने मान्य केले. मात्र त्यातील साहित्य मात्र आपले नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

कागदपत्रे माझी नाहीतच
जप्त केलेल्या बॅगमध्ये बेगच्या नावावर बनावट जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अपंगत्वाचा दाखला, रेशनकार्ड आढळून आले आहे. बेगने मात्र हे आरोप फेटाळले. ‘माझ्या नावावर कोणताही अपंगत्वाचा दाखला नसून, हे दस्तऐवज माझे नाहीतच,’ असे त्याने सांगितले. घटनेच्या दिवशी ज्या रिक्षाचालकाने कोरेगावात सोडले त्यानेही बेगला साक्षीदरम्यान ओळखले आहे. मात्र ‘पोलिसांच्या सांगण्यावरून त्याने मला ओळखले,’असा आरोप बेगने केला.
औरंगाबाद एटीएसने मला पकडले
हिमायत बेग हा टाटा डोकोमो व व्होडाफोन या कंपन्यांचे सिमकार्ड वापरत होता. त्यापैकी पोलिसांनी डोकोमोचे सिमकार्ड जप्त केले आहे आहे. हे दोन्ही कार्ड आपण वापरत असल्याची कबुली त्याने न्यायालयात दिली. ‘19 ऑ गस्ट 2010 रोजी औरंगाबाद एटीएसने मला लातूर बसस्थानकाच्या बाहेर पकडले त्या वेळी माझ्याकडे डोकोमोचे सिमकार्ड होते. मात्र एटीएसने माझ्या हस्ताक्षराचे नमुने घेतलेले नाही,’ असेही त्याने नमूद केले. तर बेगला पुण्यात पकडल्याचा एटीएसचा दावा आहे.