आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • German Backery Boamb Blast Case : Went In Srilanka For Business Purposes Himayat Baig

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: श्रीलंकेत व्यवसायासाठी गेलो होतो- हिमायत बेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत बेग (31, रा. उदगीर) याने आपण 2008 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे कापड व अत्तरचा व्यवसाय करण्यासाठी गेलो असल्याचा जबाब शुक्रवारी विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात दिला.

न्यायाधीशांसमोर आपला जबाब मांडताना बेग म्हणाला, पुण्यात डीएडचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पूना कॉलेजमध्ये बीए शाखेच्या दुस-या वर्षात प्रवेश घेतला. त्यानंतर 2008 मध्ये नोकरीच्या शोधासाठी मी औरंगाबाद, लातूर व उदगीर येथेही गेलो होतो. त्यानंतर नोकरी न मिळाल्याने मी व्यवसाय करण्याचे ठरवले व त्यासाठी मुंबईतून 40 ते 50 हजार रुपयांचे रेडिमेड कपडे व 20 हजार रुपयांचे अत्तर खरेदी करून मी कोलंबोला विक्रीसाठी गेलो. त्या ठिकाणी अपेक्षित नफा न मिळाल्याने मी पुन्हा भारतात परतलो. परंतु पोलिसांनी त्याबाबतची कागदपत्रे न्यायालयात दाखल केली नाही. उदगीर येथे माझे कोणतेही इंटरनेट कॅफे नसून तिथे माझे घर नाही. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कोणत्याही प्रकारची स्फोटके माझ्या घरातून जप्त केली नसल्याचे त्याने साक्षीत म्हटले.

जर्मन बेकरी एटीएसने दाखवली
एटीएस पथकाने मला लातूर येथे पकडल्यानंतर प्रथम पुणे व नंतर मुंबईला नेले. त्या ठिकाणी माझा छळ केला. त्यानंतर मुंबई एटीएस पथकातील अधिकारी दिनेश कदम यांच्या पथकाने मला पुण्यात जर्मन बेकरीजवळ आणून गाडीतून बेकरी दाखवली. एटीएसने डोळ्यांवर पट्टी बांधून मला दोन-तीन वेळा विराण जागेत नेले व माझा एन्काउंटर करण्याची धमकी दिली. तसेच माझे भाऊ-बहीण व भावजी यांना आम्ही याप्रकरणी ताब्यात घेऊन मारहाण करत असल्याचे सांगितल्याने एटीएस सांगेल त्याप्रमाणे पुढील काळात मी वागलो. एटीएसने को-या कागदावर माझ्या सह्या घेतल्या.

इंडियन मुजाहिदीन, भटकळ बंधूंना मी ओळखत नाही
केंद्राने बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा व सिमी या संघटनांशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. या संघटनेचे फरार आरोपी रियाज भटकळ, इकबाल भटकळ , यासीन भटकळ, मोहसीन चौधरी व फय्याज कागझी यांना मी ओळखत नसून ते माझ्या संपर्कात नसल्याची साक्ष मिर्झा हिमायत बेग याने विशेष न्यायाधीश एन.पी.धोटे यांच्या न्यायालयात शु्क्रवारी दिली.

घटनेच्या दिवशी औरंगाबादेत
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दिवशी (13 फेब्रुवारी 2010) मी औरंगाबादेत होतो तसेच त्याठिकाणी मी एका लग्नसमारंभात माझ्या मित्रासोबत होतो. दरम्यानच्या काळात औरंगाबादला मी कोणा जवळही कधी माझा फोन ठेवण्यास दिला नाही. मी कधीही बनावट कागदपत्रे बनवली नसून पोलिसांनी कसलेही बनावट दस्तावेज माझ्याकडून जप्त केले नाही.
526 प्रश्नांची विचारणा
न्यायाधीशांनी बेगला आतापर्यंत एकूण 526 प्रश्नांची विचारणा केली. याच प्रकरणातील आरोपी अब्दुल समद अहमद जरार सिद्दिबाप्पा याने जर्मन बेकरीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेच्या दिवशी बेकरीतील काउंटरवरील टोपी घातलेला संशयित व्यक्ती भटकळ असल्याचे साक्षीत म्हटले आहे.