आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Bakery Blast, Foreign Citizen Secure In India ? Public Prosecutor

जर्मन बेकरी स्फोट: परदेशी नागरिक देशात सुरक्षित आहेत का ?, सरकारी वकिलांचा युक्तिवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जर्मन बेकरी स्फोटात 17 निष्पाप मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये पाच विदेशी नागरिकांचा समावेश आहे. यावरून आपल्या देशात परदेशी नागरिक सुरक्षित आहे का, याचे उत्तर आंतरराष्‍ट्रीय स्तरावर भारताला द्यावे लागते. त्यामुळे या खटल्यातील आरोपीस कडक शिक्षा होण्याची गरज आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील राजा ठाकरे यांनी गुरुवारी केला.

ठाकरे म्हणाले की, आरोपीस पाच कलमांनुसार दोषी ठरवण्यात आले आहे. तो दहशतवादी कटात सहभागी झाल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपीच्या घरातून आरडीएक्स जप्त करण्यात आले असून हा संगनमताने केलेल्या दहशतवादी कटाचा भाग आहे. भारतीय दंडविधान संहिता कायद्यानुसार गंभीर प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असून जर्मन बेकरी खटल्यात त्यानुसार आरोपीस फाशीच व्हावी.

कसाबला विशीत फाशी
बेगचे वय कमी असल्याबद्दल बचाव पक्षाने केलेला भावनिक मुद्दा खोडताना ठाकरे म्हणाले, मुंबई स्फोटातील आरोपी याकूब मेमनला 33 व्या वर्षी तर अजमल कसाबलाही 23 व्या वर्षी फाशी सुनावली होती. बेग 33 वर्षांचा आहे. शिक्षण घेऊनही त्याने जिहादचा वापर केला, त्याला फाशीच व्हायला हवी.