आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मन बेकरी: स्‍फोट झाला तेव्‍हा औरंगाबादेत होता बेग, घरात आढळला 1200 किलो दारूगोळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी मिर्झा हिमायत इनायत बेगला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्‍ये पुण्यातील सेशन कोर्टाने त्‍याला फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर बेगने हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर त्‍याला आज मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा देत फाशीची शिक्षा रद्द केली व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हिमायत बेग सध्या नागपूरच्‍या जेलमध्ये आहे. बॉम्‍बस्‍फोटात गेला होता 17 लोकांचा बळी..
- पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 जानेवारी 2010 रोजी बॉम्‍बस्‍फोट झाला.
- उच्चभ्रू व परदेशी लोकांचे वास्तव्य असलेला हा परिसर बॉम्‍बस्‍फोटाने हादरून गेला होता.
- इंडियन मुजाहिदीनने घडवलेल्‍या या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.
- याप्रकरणी अटक झालेला एकमेव आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग (31) दोषी आढळला.
- हिमायत हा लातूर जिल्‍ह्यातील उदगीर येथील राहणारा आहे.
- या स्‍फोटात 58 नागरिक जखमी झाले होते. त्‍यामध्‍ये परदेशी लोकांचाही समावेश होता.
- या प्रकरणी बेगविरुद्ध 2607 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
बेग कोलंबो येथे व्‍यवसायासाठी गेला होता..
- मिर्झा हिमायत बेग याने आपण 2008 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे कापड व अत्तरचा व्यवसाय करण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले होते.
- पुण्यात त्‍याने डीएड पूर्ण केल्यानंतर पूना कॉलेजमध्ये बीए शाखेच्या दुस-या वर्षात प्रवेश घेतला.
- 2008 मध्ये नोकरीच्या शोधासाठी तो औरंगाबाद, लातूर व उदगीर येथेही गेलो होतो.
- नोकरी न मिळाल्‍याने बेग याने कोलंबोमध्‍ये व्‍यवसाय करण्‍याचे ठरवले.
- मुंबईतून 40 ते 50 हजार रुपयांचे रेडिमेड कपडे व 20 हजार रुपयांचे अत्तर खरेदी करून तो कोलंबोला विक्रीसाठी गेला होता.
- कोलंबोमध्‍ये त्‍याच्‍या व्‍यवसायाचा जम बसला नाही, नफा न मिळाल्‍याने तो पुन्‍हा भारतात आला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, कोलंबोत रचला गेला जर्मन बेकरीचा स्‍फोट.., उदगीरच्‍या सायबर कॅफेत बनवला होता बॉम्‍ब.., स्‍फोट झाला तेव्‍हा औरंगाबादेत होता बेग..
बातम्या आणखी आहेत...