आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गझलकार धनश्याम धेंडे यांचे पुण्यात निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ गझलकार धनश्याम धेंडे (७८) यांचे शुक्रवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. धेंडे यांचे बासरी व तहानलेलं तळं हे दोन मराठी गझल संग्रह प्रकाशित झाले अाहेत. तसेच  महाकारमणी तथागत, वर्धमान महावीर आणि पंजाबी लोकगीतांवर आधारित माहिया काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला अाहे.  

‘हुंड्याची प्रथा नारीची व्यथा’, ‘सवाल माझा ऎका’ या लोकनाट्यांचेही त्यांनी लेखन केले. आकाशवाणी पुणे केंद्र, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून त्यांच्या गझल, काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले. मराठी साहित्य संमेलने, गझल संमेलने, पुणे फेस्टिव्हल, साहित्य संस्कॄती मंडळ व अनेक कविसंमेलनांमधूनही त्यांनी गझल वाचन केले. ‘थोडं हसूया’ हा त्यांचा  विनोदी कार्यक्रमही लाेकप्रिय अाहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश हाेता. 
बातम्या आणखी आहेत...