आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्री महोदयांची जीभ घसरली, बापट म्हणाले- मी \'तशा\' क्लिप पाहातो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पोर्नसाइटवर बंदी आणण्याचे प्रयत्न करत असताना पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी, तुम्ही ज्या क्लिप पाहाता, त्या मी पण पाहातो, असे म्हणून खळबळ उडवून दिली आहे. विद्येच्या माहेरघरात विद्यार्थी हक्क परिषदेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

विद्यार्थ्यांसमोर आणि आपल्या गृह जिल्ह्यात बोलताना मंत्रिमहोदयांचा तोल सुटला. ते म्हणाले, 'तुम्ही ज्या क्लिप रात्री बघता त्या सगळ्या मला माहित आहे. मला माहित आहे रात्री सगळेजण कोणत्या आणि कुठल्या-कुठल्या क्लिप बघतात. कारण तुम्ही जे पाहाता ते मी पण पाहातो. त्यामुळे आम्ही म्हातारे झालो असे काही समजू नका. आमचं देठ अजून हिरवं आहे.' सभेत हशा पिकवण्यासाठी बापटांनी केलेले हे विधान त्यांना अडचणीचे ठरेल हे त्यांना कदाचित लक्षात आले नाही. राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर बोलताना काही साधनसुचिता पाळायच्या असतात हेच ते विसरुन गेले, असे कार्यक्रमानंतर अनेकांनी दबक्या आवाजात चर्चा सुरु केली.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पोर्न साइटवर बंदी आणण्यासंबंधी पाऊले उचलली होती. त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याने या क्लिप पाहाण्याची कबुली दिल्याने, खळबळ उडाली आहे. दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीष बापट यांनी मी तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव केली आहे. 'तशा' क्लिप पाहू नका असे मी विद्यार्थ्यांना सांगितल्याचे बापट म्हणाले.