आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीष बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट; पोस्ट केले महिलांचे अश्लील फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर महिलांची अश्लील फोटो पोस्ट करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. ऋतुराज नलावडे (वय-30, रा. जुन्नर) असे आरोपीचे नाव असून त्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. बापट यांचे माध्यम सल्लागार सुनील माने यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

मिळालेली माहिती अशी की, आरोपीने गिरीष बापट यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्यावर महिलांचे अश्लिल फोटो पोस्ट केले होते. हा प्रकार 22 जून रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी सुनील माने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
 
आरोपीने गिरीष बापट यांच्या मूळ फेसबुक अकाऊंटवरून काही फोटो घेतले आणि त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्यावर  महिलांचे अश्लिल फोटो पोस्ट केले. बंडगार्डन पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...