आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात सीईओ पित्‍याचा मुलीवरच बलात्‍कार; बढतीसाठी पाठवले बॉसकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव पार्क भागातील एका कंपनीच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिका-यावर पोटच्‍या पोरीनेच बलात्‍काराचा आरोप केला आहे. तीन वर्षांपासून अत्‍याचार सुरु असल्‍याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. एवढेच नव्‍हे तर तिने तिच्‍या आजोबांवरही बलात्‍काराचा आरोप केला आहे.

मुलीने केलेल्‍या आरोपांनुसार, पित्‍याकडून तिच्‍यावर 3 वर्षांपासून अत्‍याचार सुरु होते. बॉस आणि त्‍याच्‍या ग्राहकांकडेही तो मुलीला पाठवत होता. नकार दिल्‍यावर तिला तो बेदम मारहाणही करायचा. हा प्रकार तिने आजोबांना सांगितल्‍यानंतर त्‍यांनीही तिच्‍यावर बलात्‍कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तिच्‍या आजोबांना अटक केली आहे. आजीनेही त्‍यांची साथ दिल्‍याचा आरोप पीडितेने केला आहे. मुलीच्‍या तक्रारीनंतर पिता फरार आहे.

पीडित मुलगी बी. कॉमची विद्यार्थिनी आहे. वडिलांच्‍या विकृत स्‍वभावामुळे तिची आई दिर्घ कालावधीपासून वेगळी राहत आहे. वडिलांनी तिला बॉस आणि इतरांकडे पाठवायला सुरुवात केल्‍यानंतर ती होस्‍टेलमध्‍ये राहायला गेली. परंतु, तीन दिवसांपूर्वी ती घरी आली होती, तेव्‍हा पुन्‍हा तिच्‍यावर अतिप्रसंग झाला.