आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलाचा मेहुणीवर ब्लेडने वार, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भेटायला येत जाऊ नकोस असे मुलीने सुनावताच दिपकने  (25) मुलीवर ब्‍लेडने वार केले. - Divya Marathi
भेटायला येत जाऊ नकोस असे मुलीने सुनावताच दिपकने (25) मुलीवर ब्‍लेडने वार केले.
पिंपरी चिंचवड- प्रेम प्रकरणातून मामाच्या मुलाने आपल्या आत्याच्या मुलीवर (मेहुणीवर) ब्लेडने वार केल्‍याची घटना भोसरी येथे घडली आहे. बुधवारी रात्री 8च्‍या सुमारास झालेल्‍या या हल्‍ल्‍यात मुलगी जखमी झाली आहे. दीपक गायकवाड असे हल्‍लेखोराचे नाव असून त्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दीपक गायकवाडचे (25) गेल्या काही वर्षांपासून आपल्‍या आत्‍याच्‍या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र तिचा विवाह झाला असून तिला दोन मुलही आहेत. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दीपक युवतीला भेटायला भोसरी येथे बालाजीनगर येथे गेला होता. हे न आवडल्‍याने 'मला भेटत जाऊ नकोस', असे युवतीने दिपकला सुनावले. त्‍यामुळे संतापलेल्‍या दिपकने तिच्‍यावर ब्‍लेडने वार केले. हल्‍ल्‍यात युवती जखमी झाली असून तिच्‍यावर सध्‍या रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी दिपकला MIDC पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे व अधिक तपास चालु आहे.

बातम्या आणखी आहेत...