आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्‍कार पीडित युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, माजी आमदाराचा नातू आरोपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिरूर तालुक्याचे माजी अामदार पाेपटराव गावडे यांचा नातू अाणि टाकळी हाजी गावचा उपसरपंच अजित गावडे (२३) याने २२ वर्षीय तरुणीस लग्नाचे अामिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. मात्र त्यानंतरही अाराेपीवर कारवाई हाेत नाही, उलट अापल्याला व कुटुंबियांना अारोपींकडून त्रास हाेत असल्याने पीडित तरुणीने मंगळवारी विषारी गाेळ्या खाऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पीडित तरुणी नर्स असून ती मंगळवारी रात्री विश्रांतवाडी येथे तिच्या काकाच्या घरी अाली हाेती. तिथेच तिने अात्महत्येचा प्रयत्न केला. त्यापूर्वी तरुणीने चारपानी सुसाइड नाेट लिहिलेली अाहे.
बातम्या आणखी आहेत...