आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात वडगाव बुद्रुक परिसरात पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वडगाव बुद्रुक परिसरात बांधकामाचे पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या टाकीत पडून अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जान्हवी दत्तात्रय कुंवर (वय अडीच वर्ष, रा. लक्ष्मीनिवास, विकासनगर, वडगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीचे वडील दत्तात्रय कुंवर हे खासगी ठिकाणी नोकरी करतात; तर आई गृहिणी असून, ते वडगाव बुद्रुक येथे राहतात. त्यांच्या घरासमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाला लागणारे पाणी साठविण्यासाठी एक टाकी तयार करण्यात आली आहे. जान्हवी घरासमोर खेळत होती. तिची आई घरात काम करत होती. तर, वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. जान्हवी खेळत-खेळत त्या पाण्याच्या टाकीजवळ गेली. टाकी उघडी असल्यामुळे खेळताना जान्हवी टाकीत पडली.

 

बांधकाम साइटवरील कामगाराला टाकीत मुलगी पडल्याचे दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. तिला तत्काळ बाहेर काढून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सिंहगड रोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांपूर्वी याच परिसरात खेळताना खड्डयातील पाण्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...