आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IT तरूणीच्या हत्येचा सहा महिन्यानंतर उलगडा, फ्लिपकार्टमुळे प्रियकर गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/उस्मानाबाद- सहा महिन्यापूर्वी उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली शिवारात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. केवळ मोबाइल लोकेशनवरून खून झालेल्या तरुणीसह तिच्या मारेकऱ्याचीही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी पुण्यातील एका आयटी कंपनीतील तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रकाश सूर्यकांत चाफेकर (36 रा. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून व लग्नाचा तगादा लावल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे. कांचन परदेशी (रा. पुणे) असे या मृत तरूणीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, कांचन परदेशी ही तरुणी पुणे येथील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून ती बेपत्ता असल्याबाबत जुलै 2015 मध्ये ठाण्यात मिसिंगची नोंद केलेली आहे. परंतु, वास्तविक पाहता कांचनचे मुख्य आरोपी प्रकाश सूर्यकांत चाफेकर यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही पुणे येथील एकाच आयटी कंपनीत कार्यरत होते. मात्र, यातील चाफेकर हा विवाहित होता. त्याची नागपूर येथे बदली झाली होती. कांचन बेपत्ता झाल्यापासून त्याच्यासोबतच नागपूरला रहात असल्याचे तपासात समोर आले. परंतु, कांचनने लग्नासाठी प्रकाशच्या मागे तगादा लावल्यानेच प्रकाशने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
याचदरम्यान फिरायच्या बहाण्याने कांचनला सोबत घेऊन प्रकाश औरंगाबाद, नांदेड, लातूर मार्गे उस्मानाबाद येथे आला होता. येथे आल्यानंतर गाडी बिघडल्याचा बहाणा करून त्याने वाघोली येथील नातलगाला मित्र असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर उस्मानाबाद- वाघोली मार्गावरच 20 डिसेंबर 2015 रोजी कांचनवर चाकूने वार करून तसेच गळा चिरून तिची हत्या केली.
21 डिसेंबर 2015 रोजी उस्मनाबाद तालुक्यातील वाघोली येथील शिवारात एका तरुणीचा खून करून तिचा मृतदेह पोत्यात बांधून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकण्यात आला होता. तपासादरम्यान खून झालेल्या तरुणीचीच ओळख पटत नसल्याने आरोपींना कसे शोधायचे हे आव्हान पोलिसांसमोर होते. प्रथम हा तपास ग्रामीण पोलिसांकडे होता. परंतु, पाच महिन्यांत कोणतीच प्रगती झाली नाही. अखेर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी अवघ्या महिनाभरातच या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली. तसेच प्रकाशच्या वाघोलीतील एका नातेवाईकाला अटक केली आहे.
पुढे वाचा, जयपुरी कुर्ता व फ्लिपकार्टमुळे झाला खुनाचा उलगडा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...