आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसला घरात...अन् अल्पवयीन मुलीसोबत केले अश्लिल चाळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका भामट्याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

पीडितेच्या आईने या घटनेची माहिती वाकड पोलिसांना दिली. आरोपी अण्णा बबन कांबळे (रा.वाकड ) याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण...?

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वाकडमधील अण्णाभाऊ साठे नगरात ही घटना घडली. पीडितेची आई धुनी-भांडी घासण्याचे काम करते. घटना घडली तेव्हा पीडिता घरात एकटी होती. आरोपी अण्णा कांबळे हा तरुण पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आला. मुलीला घरात एकटी असल्याचा फायदा घेत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. आई घरी परतल्यानंतर मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. आईने आरोपी अण्णा कांबळे विरोधात वाकड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिला आपल्या घरात सुरक्षित राहिल्या नसून असे अनुचित प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून  महिलांना छेडछाडीच्या घटनेत वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...