आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचे अधिकार द्या गृहमंत्री पाटील यांची केंद्राकडे मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशात दरवर्षी अपघातात एक लाख 36 हजार लोक मृत्युमुखी पडतात. राज्यात हाच आकडा 13 हजारांपर्यंत आहे.
बेशिस्तपणे वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाईची गरज आहे. परंतु हे अधिकार केंद्राकडे असून त्यामुळे काही बंधने येतात. केंद्राने हे अधिकार राज्यांना देण्याची गरज आहे, मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.

राज्य रस्ते सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. परिवहन राज्यमंत्री गुलाब देवकर, आमदार गिरीश बापट, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, अभिनेता प्रशांत दामले, नीलेश साबळे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, वाहतूक आयुक्त विजय कांबळे, पुणे पोलिस आयुक्त गुलाब पोळ उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात व त्यात मुख्यत्वे तरुण पिढीचा बळी जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वयंशिस्त लावणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दारू पिऊन वाहन चालवणा -या ंविरोधात कडक पावले उचलण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. दु्रतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

बंटी जहागीरदारवरील कारवाई योग्यच
पुणे स्फोटाशी संबंधित असलेल्या बंटी जहागीरदारला पुरावे मिळाल्यानंतरच अटक करण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व आतंकवादी कारवायात सहभागी असलेल्या व्यक्तींपर्यंत पोलिस पोहोचू शकतात हे यातून सिद्ध झाले. अशा घटनांत ज्यांचा सहभाग असतो ते छुप्या पद्धतीने काम करतात त्याबाबतची सत्य माहिती तपासातून बाहेर येईल, असेही गृहमंत्री पाटील म्हणाले.