आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णांना झेड प्लस सुरक्षा द्या, वकीलाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी केली आहे. सध्या अण्णांना असलेली ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्थाही अ‍ॅड. पवार यांनीच यापूर्वी शासनाकडे पत्रव्यवहार करून मागितली होती; परंतु अण्णांनी ती नाकारली होती. अ‍ॅड. पवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे या मागणीचे पत्र पाठवले आहे. ‘झेड प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात अण्णांकडे विचारणा केल्यास ते सुरक्षा काढून घ्या, असे म्हणतील. परंतु सध्याचे वातावरण व घटना पाहता महाराष्ट्र सरकारने जबाबदारी समजून अण्णांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी,’ असे अ‍ॅड. पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनीही चोख सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचे सूचित केले.