आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goan Thalati Arrest At Maval, Bribe Rupees 1 Lakh

मावळात 1 लाखाची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शेतजमिनीच्या 7/12 उता-यावर नाव वाढवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना मावळातील एका तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. मावळ तालुक्यातील मळवली गावात कार्यरत असलेले गणेश पोतदार अशी अटक झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोतदार यांच्याविरोधात तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मळवलीत शेतजमिन असणा-या एका शेतक-याने 7/12 मध्ये एका कुटुंबियांचे नाव वाढवायचे होते. त्यासाठी मळवलीचे तलाठी पोतदार याच्याकडे संबंधित शेतक-याने अर्ज केला. मात्र, नाव समाविष्ठ करण्यासाठी पोतदार यांनी शेतक-याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली.
लाच मागितल्याने संबंधित व्यक्तीने पुण्याच्या लाचलुचपत विभागाकडे पोतदार याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित तक्रारदार आणि लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी मिळून सापळा रचला. त्यानुसार आज सकाळी 11 च्या सुमारास पोतदार यास तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही सरकारी कर्मचा-याने अथवा त्यांच्या एजंटानी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाकडे तत्काळ तक्रार नोंदवा असे आवाहन पुणे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.