आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदूकाका सराफ यांच्याकडील साेन्याची १२० नाणी लंपास, ३२ लाख ५० हजारांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना सोन्याची नाणी भेट द्यायची असल्याचे सांगून एका भामट्याने अहमदनगर येथील चंदूकाका सराफ ज्वेलर्सची सोन्याची १२० नाणी लंपास केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पाेलिस ठाण्यात संताेष उर्फ स्टिव्हनदास गाेंडवीन याच्याविरोधात ३२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

याप्रकरणी खराडी येथील कार व्यावसायिक परमेश्वर माेहन खैरे यांनी फिर्याद दाखल केली अाहे. स्टिव्ह हा गेल्या चार-पाच दिवसांपासून विमाननगर येथील उच्चभ्रू हाॅटेलमध्ये वास्तव्यास हाेता. त्याने खैरे यांच्याकडून फिरण्यासाठी स्विफ्ट डिझायर कार भाड्याने घेतली हाेती. या कारवर खैरे यांच्याकडील निंबाळकर हा चालक हाेता.

त्याच्यामार्फत स्टिव्हने खैरेशी संपर्क साधत अापण खराडी येथील रिगस अाॅरगाॅन टेक वर्ल्ड ट्रेड सेंटर युअाॅन अायटी पार्क येथील कंपनीत मॅनेजर असल्याचे सांगितले. दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना साेन्याची नाणी वाटप करायची असल्याचे सांगून त्याने अाेळखीचा काेणी ज्वेलर्स अाहे का? असे त्यांना विचारले. त्यानुसार खैरे यांनी अहमदनगर येथील चंदूकाका ज्वेलर्स येथे काम करणारे आपले मामा अंबादास फुंदे यांच्याशी त्याचा संपर्क करून दिली. त्यानुसार स्टिव्हने साेन्याची १२० नाणी डायरेक्टरला दाखवून अाणताे असे सांगून लंपास केली.