आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात सोन्याचे बाप्पा, किंमत १६ लाख; चतुर्थीपर्यंत दर्शन घेता येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तब्बल पाच फूट उंच आणि चार फूट रुंद, अशी भारदस्त शुद्ध बावनखणी सोन्याने मढवलेली गणेशमूर्ती पुण्याच्या एका ज्वेलर्सच्या बंडगार्डन येथील दालनात नुकतीच दाखल झाली. तिचे मूल्य सुमारे साडेसोळा लाख रुपये आहे. ही देशातील पहिली सर्वांत मोठी २४ कॅरेट सोन्याची मूर्ती असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. १७ सप्टेंबरपर्यंत या मूर्तीचे दर्शन घेता येईल.

ही मूर्ती थायलंडमधील ‘प्राणदा ज्वेलरी कंपनी’च्या कारखान्यात घडवण्यात आली आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्यात ती घडवण्यात आली आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. ही मूर्ती खास विमानाने पुण्यात आणण्यात आली. मूर्तीचे हे पहिलेच मॉडेल आहे. यानंतर मागणीनुसार लहान आकाराच्या मूर्तीही बनवल्या जाणार आहेत, असे या पेढीच्या वतीने सांगण्यात आले.
असा आहे सुवर्णगणेश
०५ - फूट उंच
०४ - फूट रुंद
०५ - किलो वजन
२४ - कॅरेट सोन्यातून घडवली मूर्ती
मूर्तीची निर्मिती थायलंडमधील
०३ - महिने मूर्ती घडवण्याचा कालावधी
१६ - लाख ५४ हजार ५०० रुपये मूल्य
०४ - फूट रुंद मूर्ती.