आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: ज्योतिषाच्या सांगण्यावरून व्यावसायिकाने बनवली \'गोल्डन कार\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील गर्दीने व वाहतुक कोंडीने वेढलेल्या रस्त्यावर सोनेरी रंगाची ज्गवॉर कार पाहून लोक तोंडात बोट घालत आहेत. पुण्यातील एक रियल इस्टेट व्यावसायिक सचिन खेसे याची ही कार आहे. खेसे याने 2 लाख रूपये खर्च करून काळ्या रंगाच्या ज्गवॉर गाडी सोनेरी पिवळ्या रंगाने रंगवली आहे. ज्योतिषाच्या सांगण्यावरून खेसेने सोनेरी रंग करून घेतला आहे.
ज्योतिषाचा सल्ला-
20 वर्षीय सचिन खेसे याने मागील वर्षी ऑक्टोबर 2014 मध्ये 63 लाख रूपयांची ज्गवॉर कार खरेदी केली. त्यावेळी कारचा रंग काळा होता. सचिनने ही कार आपल्या ज्योतिषाला दाखवली. त्यामुळे कारचा काळा रंग तुला शुभ नाही असे सांगितले. सचिनने कंपनीच्या डिलरकडे याबाबत चौकशी केली असता त्याला काळ्या रंगाऐवजी सोनेरी (गोल्डन) रंग देण्याचा सल्ला दिला. खेसेने गोल्डन कलरचे बजेट काढले व ते दोन लाखाच्या घरात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने काळ्या रंगाऐवजी सोनेरी रंग करण्यास सांगितले. यावर डीलरने सांगितले की, दुबईत कारवर सोन्याची चादरी लावण्याची पद्धत आहे मात्र पुण्यात अद्याप कोणीही गोल्डन कार बनवली नव्हती. मात्र सचिनच्या मागणीनुसार तसा कलर करून दिला आहे.
सचिनजवळ आहेत 12 लग्झरी कार-
सचिनला लग्झरी कार गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. त्याच्याजवळ वेगवेगळ्या ब्रॅंडच्या 12 अलिशान गाड्या आहेत. त्याने आपली पहिली कार 2007-2008 मध्ये खरेदी केली होती. जसे-जसे त्याचा रियल एस्टेट बिजनेस वाढत गेला तशा तशा त्याच्याकडील गाड्याची संख्या वाढत गेली. त्याच्याजवळ 1 कोटीपेक्षा जास्त किमतीची मर्सिडीज (एस क्लास) आणि 2 कोटीची एक रेंज रोवर कारही आहे.
प्रतिष्ठित परिवारातील आहे सचिन-
सचिन खेसे हा शहरातील एका प्रतिष्ठित परिवारातील आहे. त्याच्या कुटुंबियांचा बडा व्यावसाय आहे. तसेच त्यांच्याकडे पुण्यात मोक्याची जागी जमिनी आहेत. सचिनचे काका पांडूरंग खेसे पुणे मार्केट कमेटीवर आहेत तर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. खेसे परिवाराची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचे सांगितले जाते.
पुढे पाहा, गोल्डन कारची छायाचित्रे....