आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या जेलमध्ये संजय दत्त राहणार लाइव्ह, कैद्यांच्या भत्त्यात होणार वाढ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तीन वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने कैद्यांच्या रोजगार भत्त्यात वाढ करण्याची तयारी दाखवली आहे. दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विविध कारगृहांमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांना अत्यल्प वेतन मिळते. वाढत्या महागाईचा विचार करुन वेतनात वाढ करण्याचा विचार राज्याच्या गृहविभागाने केला आहे.

राज्य सरकारने वेतनवाढ सुधारणेसाठी पुण्याच्या पाच अधिका-यांची एक समिती गठीत केली आहे. ही समिती एक महिन्यात त्यांचा अहवाल राज्य सरकारला देणार आहे. या अहवालाच्या आधारावरच राज्यातील कैद्यांना वेतनवाढ दिली जाण्याची शक्यत आहे.