आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात 9 तासांत तीन ठिकाणी रेल्वेला अपघात; खंडाळ्याजवळ 6 डबे घसरले, अनेक गाड्या रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने डबे रुळावरून हटवण्याचे काम हाती घेतले हाेते. - Divya Marathi
मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने डबे रुळावरून हटवण्याचे काम हाती घेतले हाेते.
नवी दिल्ली/सोनभद्र/खंडाळा/पुणे- देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी देशभरात उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रात रेल्वे रुळावरून घसरल्या. सुदैवाने या अपघातांत जीवितहानी झाली नाही. उत्तर प्रदेशात सकाळी ६.२५ वाजता शक्तिपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे घसरले. ही गाडी प. बंगालच्या हावडाहून मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जात होती. हा महिनाभरातील चौथा व पीयूष गोयल यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा पहिला अपघात आहे. गुरुवारी ११.४५ वाजता दिल्लीत रांची-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मिंटो ब्रिजजवळ रुळावरून घसरली. यात एक जण जखमी झाला. दरम्यान, यूपीतील फारुखाबाद व फतेहगड दरम्यान स्थानिकांना रेल्वे रुळ तुटल्याचे दिसले. याची माहिती तत्काळ मिळाल्याने अपघात टळला.

खंडाळ्याजवळ ६ डबे घसरले
रेल्वेची गाडी सातत्याने  घडणाऱ्या  अपघातांतून अद्याप सावरली नसल्याचे गुरुवारी पुन्हा दिसून आले. खंडाळा  रेल्वे स्टेशनजवळ गुरुवारी सायंकाळी मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याने  पुण्याच्या  दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून, पुण्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. 

खंडाळ्याजवळ मालगाडीचेडबे घसरले; अनेक रेल्वे रद्द
खंडाळ्यापासून  १२३ - १२४  किमी दरम्यान सायंकाळी साडेचारच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली. त्यामुळे तातडीने  मुंबईकडून पुण्याला येणाऱ्या  सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात डेक्कन क्वीन, सिंहगड, एक्स्प्रेस, इंद्रायणी, प्रगती, महालक्ष्मी, सह्याद्री, लातूर, इंटरसिटी, उद्यान, शिर्डी, राजकोट, सिकंदराबाद, हुबळी, सिद्धेश्वर  एक्स्प्रेस आदी  १४ रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. लांब पल्ल्याच्या अन्य गाड्याही विलंबाने धावणार हे स्पष्ट आहे. युद्धपातळीवर घसरलेले डबे हलवण्याचे व रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असले तरी  रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास सहा ते सात तासांचा कालावधी लागू शकतो, असे रेल्वेच्या सूत्रांनी कळवले आहे.  सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. गुरुवारी सायंकाळी खंडाळ्याजवळून जाणाऱ्या  मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यात रुळाजवळचे खांबही कोसळले. त्यामुळे  रुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत रुळावरून डबे घसरण्याची ही तिसरी घटना आहे. १८ जुलैला हैदराबाद एक्स्प्रेस, तर २९ ऑगस्टला हुबळी एक्स्प्रेसचे डबे घसरले होते. गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशातही  शक्तिपुंज एक्स्प्रेस, तर दिल्लीजवळ अाणखी एका रेल्वेगाडीचे डबे घसरून अपघात झाल्याचे वृत्त आहे.  
 
या एक्स्प्रेस गाड्या रद्द...
सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस
सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस
कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस
सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस
सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस

या एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम...
-पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस पुण्याजवळच थांबवली
- कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच
- सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबई ते पुण्यादरम्यान रद्द
- सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जतपर्यंतच.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताचे फोटो
बातम्या आणखी आहेत...