पुणे - पुण्यात एका कुख्यात गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. परशुराम ऊर्फ परशा पांडुरंग जाधव (39, रा. धनकवडी, पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बाळा चौधरी व त्याच्या नऊ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
संजय निवृत्ती मोरे याने याबाबत तक्रार दिली आहे. जाधव हा गुंड बाबा बोडकेचा साथीदार असून त्याच टोळीत कार्यरत होता. त्याच्यावर हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद होती. जाधव पुण्यात रिअल इस्टेटचे काम करत होता. शुक्रवारी एका जमिनीसंदर्भात त्याच्या घरी काही जण आले होते. त्यानंतर त्यांनी जाधवला निंबाळकरवाडी येथे नेऊन त्याच्यावर जवळून पाच
गोळ्या झाडून त्याचा खून केला.