आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडेंची सरकारवर टीका, दाभोलकरांचे मारेकरी मोकाट राहणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांना पकडण्यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. ‘साधा कॉन्स्टेबल बदलण्याचे अधिकार मला नाहीत’, असे राज्याचे गृहमंत्री जाहीरपणे सांगतात. अठ्ठेचाळीस तास उलटल्यानंतरही कोणालाच पकडलेले नाही. याच पद्धतीने तपास सुरू राहिला तर डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट राहण्याची भीती आहे,’ असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे.

‘‘काँग्रेस आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याने राज्यात कुठेही कायदा-सुव्यवस्थेचे राज्य नाही. याआधी पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश शेट्टी, आय.टी. तज्ज्ञ दर्शना टोंगरे, अलुरकर कॅसेट्सचे मालक अलुरकर यांचे खून झाले. परंतु यातल्या एकाही खूनप्रकरणातले मारेकरी सरकारला पकडता आले नाहीत. या मारेक-यांना वेळीच पकडले असते तर डॉ. दाभोलकरांवर हल्ला करण्याचे धाडस झाले नसते. दाभोलकरांचा जीव सरकार वाचवू शकले नाही,’ अशी टीका मुंडे यांनी केली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ यांच्या ब्रीक आर्किटेक्चर कॉलेजचे उद््घाटन मुंडे यांनी गुरुवारी पुण्यात केले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी, शांत शहर असा लौकिक असलेल्या पुण्यात दाभोलकरांची हत्या झाल्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरा बसला आयुष्यभर प्रामाणिकपणे आणि ध्येयनिष्ठेने चळवळी करणा-या डॉ. दाभोलकरांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या आहे. डॉ. दाभोलकर निर्भय होते,’असे मुंडे यांनी सांगितले. आणखी काय म्‍हणाले मुंडे हे वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...