आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेमुळे वाढला असता मतांचा टक्का - गोपीनाथ मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘‘राज ठाकरे सोबत आले असते तर महायुतीच्या मतांचा टक्का वाढला असता. यासाठीच मी मनसेला महायुतीत आणण्याचे प्रयत्न केले. पण ते सफल झाले नाहीत,’’ अशी कबुली भारतीय जनता पक्षाचे उपनते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. मनसेबरोबरच्या मैत्रीचा विषय आता आमच्यासाठी संपला असून आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. मनसे आमची वाट अडवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

मनसेला मत कशाला?
‘‘नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे होते तर मनसेला निवडणूक लढवण्याचीही गरज नव्हती. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे खासदार समर्थ असताना मग जनतेने मनसेला मते का द्यावीत?’’ असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने मनसेही मोदींच्या नावावर मते मागताना दिसत आहे. मनसेने मोदींचे नाव वापरूनये. मुंबईतील 30 टक्के गुजराती समाज आणि मराठी समाज महायुतीच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे यंदा मुंबईत मनसेमुळे आम्हाला नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले.

पवारांनी मगच बीड सोडावे
‘‘मुंडे यांना जिल्ह्याबाहेर पडू देणार नाही, असे पवार सांगत होते. मला ते कोंडू शकले नाहीत. पण स्वत:च चार दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीही त्यांनी बीडमध्ये मुक्काम ठोकला होता. मी मात्र बीडचा उमेदवार असूनही आतापर्यंत 23 मतदारसंघांत सव्वाशेहून अधिक प्रचारसभा घेऊन आल्याचे मुंडे म्हणाले.