आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ज्ञानेश्वरी’ची सव्वाचारशे वर्षांपूर्वीची प्रत उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ची तब्बल सव्वाचारशे वर्षांपूर्वीची दुर्मिळ हस्तलिखित प्रत येथील मराठी हस्तलिखित केंद्राकडे उपलब्ध झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतींमध्ये ही प्रत सर्वात जुनी असल्याचा दावा हस्तलिखित अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी केला आहे.

प्रस्तुत दुर्मिळ हस्तलिखित प्रत तीन महिन्यांपूर्वी येथील डेक्कन कॉलेजमधील अमेरिकन इन्स्टिट्यूटच्या मराठी हस्तलिखित केंद्रात मिळाली, अशी माहिती मंजूळ यांनी दिली. माउलींची सेवा करण्याच्या हेतूने पूर्वीच्या होळकर संस्थानातील रामजी नामक भक्ताने शके १६१४ ते १६१६ म्हणजेच इसवी सन १६९२ ते १६९४ या दोन वर्षांच्या काळात अजानवृक्षाच्या तळाशी बसून ही हस्तलिखित प्रत तयार केल्याचा उल्लेख आहे. हा सर्वात जुना उल्लेख मानला जात आहे.

पंढरपूर येथील प्रल्हाद महाराज बडवे यांचे होळकर संस्थानातील शिष्य म्हणजे हे रामजी होत. स्वत: बडवे यांनी पांडुरंग माहात्म्य लिहिले आहे. ते स्वत: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी महाराजांना श्रीविठ्ठलाचा प्रसाद दिला होता. त्याच बडवे यांचे रामजी हे शिष्य होत. ही प्रत पंढरपूर येथील होळकर वाड्यात वसंतराव बोरखेडकर -बडवेंनी जतन केली आहे. रामजी यांचा काळ एकनाथ महाराजांच्या समकालीन आहे, असे मंजूळ म्हणाले. मूळ माउलींची ज्ञानेश्वरी आणि रामजी यांची हस्तलिखित प्रत यात मंगलाचरणात एक पाठभेद असल्याचा उल्लेखही मंजूळ यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...