आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Not Keep Promise, Prithviraj Chavan Critised

अपेक्षाभंग करणारे उद्धट सरकार, पृथ्‍वीराज चव्हाण यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘भाजप सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. या सरकारची कारभारावरची पकडही सुटत चालली आहे. दुस-या बाजूने मंत्री मात्र उद्धट वक्तव्ये करण्यात मग्न आहेत,’ अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी चव्हाण बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

'विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवरील चर्चा टाळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये; अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडू,’ असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
अनेक आश्वासने देत सत्तेवर आलेल्या सरकारकडून जनतेचा घोर अपेक्षाभंग झाला आहे. सरकारमधील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यावर टीका करू लागले असून कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मंत्री टीका करीत असून दुसरीकडे मित्रपक्ष हल्ले चढवित आहेत. शिवसेनेने भाजपवर केलेल्या टीकेत नक्कीच तथ्य आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.