आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Not Serious On Bomb Blast , Ramdev Baba Critise On Union Government

स्फोटांबाबत सरकार गंभीर नाही, रामदेव बाबांचा केंद्रावर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बोधगया येथील बॉबस्फोट हा आपल्या धर्म, संस्कृती व परंपरेवरील हल्ला आहे, पण केंद्र सरकार त्याविषयी गंभीर नाही, अशा शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी मंगळवारी टीका केली. तपास यंत्रणात समन्वय साधण्याऐवजी त्यांना झुंजवत ठेवण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.दिग्विजयसिंग यांना वेड लागले आहे. पण कॉँग्रेसला असे फालतू कुत्रे पाळायलाच आवडते, अशा शब्दांत त्यांनी सिंग यांचा समाचार घेतला.


हे तर अनर्थमंत्री: देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून अर्थमंत्रीच अनर्थमंत्री ठरले आहेत. रुपयाचे इतके अवमूल्यन झाले आहे, की आणखी काही काळ सत्तेत राहिले तर कॉँग्रेस देशच गहाण ठेवेल. न्यायालयाच्या आदेशानंतरही हा पक्ष काळा पैसा साठवणा-यांची नावे जाहीर करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर तांदूळ, गहू स्वस्तात देण्याच्या घोषणा करणारे हे सरकार त्याच्या उत्पादनाचा खर्चही शेतक-यांना देऊ शकत नाही, असेही रामदेव म्हणाले.