आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारामतीत गोविंदांची पोलिसांना मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - दहीहंडी कार्यक्रमानिमित्त रेल्वेस्टेशनच्या मैदानावर झालेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बारामतीत पोलिसांना लाठीमार करावा लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गोविंदांनी मात्र कायदा हातात घेत काही पोलिसांना मारहाण केली.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष योगेश जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी बॉलीवूड अभिनेते शक्ती कपूर व त्यांची मुलगी सिनेतारका श्रद्धा यांना आमंत्रित केले होते.
सिनेतारकांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे मैदानावर एकच गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मात्र, या प्रकारामुळे संतप्त झालेले काही गोविंदा व प्रेक्षकांच्या जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. यात दोन- तीन पोलिस शिपाई व एक अधिका-याला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.