आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल्डरांसाठी ‘प्रीपेड मीटर’ची योजना, २८ हजार गावांत वीज बिलमाफीचीही योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून बिल्डरांसाठी लवकरच प्रीपेड मीटर योजना सुरू करणार आहे. यामुळे बिल्डरांकडून होणारी सदनिकाधारकांची फसवणूक थांबू शकेल,’ अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, बिल्डरांनी वीज बिल थकवल्याच्या अनेक तक्रारी आल्याने हा निर्णय घेतला जात आहे. पुढील महिन्यात या योजनेला मूर्त रूप दिले जाईल. राज्यातील वीज वितरण आणि उत्पादन यांचा दर्जा सुधारण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये ८ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. सध्या राज्य विजेच्या बाबतीत 'सरप्लस' असल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फीडर मॅनेजमेंट सिस्टिम सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळी भागात यंदा ३३ टक्के वीज बिलमाफी देण्यात आली आहे. आणखी २८ हजार गावांमधली टंचाई स्थिती लक्षात घेऊन वीज बिल माफी येईल, असे बावनकुळे म्हणाले.

४ लाख जोडण्यांची मागणी प्रलंबित
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात ४ लाख घरगुती वीज जोडण्यांची मागणी प्रलंबित राहिली आहे. येत्या वर्षभरात या प्रलंबित जोडण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे उर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

सदनिकाधारकांची लूट थांबणार
प्रीपेड मीटरचा प्रयोग राज्यात प्रथमच होत आहे. नव्या प्रकल्पांसाठी बिल्डर वीज जोडणी घेतात; परंतु वीज बिल भरतच नाहीत. हा बोजा नंतर येणाऱ्या सदनिकाधारकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा वीज तोडण्याची वेळ येते. प्रीपेड मीटरमुळे त्याला आळा बसेल.
बातम्या आणखी आहेत...