आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grand Mother Stopped Grand Daughter Child Marriage, Mother Father With Youth Arrested

आजीने रोखला नातीचा बालविवाह,तरुणासह आई-वडिलांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील अतिशय हलाखीच्या परिस्थितीतील एका 16 वर्षीय मुलीचा विवाह जबरदस्तीने पंचवीस वर्षीय मुलासोबत शुक्रवारी लावून देण्यात येत होता. मात्र, मुलीने वेळीच याबाबत आपल्या आजीला माहिती दिल्याने हा बालविवाह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला. याप्रकरणी मुलीचे आई -वडील व तरुणाच्या नातेवाइकांना पोलिसांनी अटक केली आहे.
देहूरोड येथे ही मुलगी राहत असून तिच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे तिच्या आईने जबरदस्तीने दापोडी येथील एका 25 वर्षीय तरुणासोबत तिचा विवाह लावण्याचे ठरवले. मात्र, हे लग्न मुलीस मान्य नसल्याने तिने याबाबत आजीला सांगितले. आजीने सामाजिक कार्यकर्ते डॉ. यामिनी आडबे यांच्या मदतीने देहूरोड पोलिसांना याबाबत माहिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी थेट लग्नमंडपात धडक देत हा बालविवाह रोखला.