आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वेळीच्या कर्जमाफीत अनेक घोटाळे झाले, आम्ही मात्र तसे होऊ देणार नाही -मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
पुणे - यापूर्वीच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत घोटाळे झाले होते असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. आता मात्र, तशा प्रकारचा घोटाळा पुन्हा होऊ देणार नाही, असे सांगताना प्रशासनाला कर्जमाफीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
 
 
शेतकऱ्यांच्या संपापुढे नमलेल्या महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्जमाफी दिली. त्यावर पुणे येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी गरजू शेतकरी वंचित राहणार नाही याची खात्री करून दिली. 2008 मध्ये यूपीए सरकारने देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले होते. त्या कर्जमाफीमध्ये घोटाळे आणि गैरव्यवहार झाल्याचे आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. 
 
 
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री म्हणाले, 'गेल्या वेळी झालेल्या कर्जमाफीमध्ये घोटाळे झाले यासंदर्भात कॅगने दिलेला अहवाल आमच्यासाठी डोळे उघडणारा आहे. तब्बल 80 लाखांचे कर्ज असलेल्यांना सुद्धा त्याचा लाभ देण्यात आला होता. काही तर शेतकरी सुद्धा नव्हते. तर काही बँकांनी राईट ऑफ केलेले कर्ज सुद्धा परत हिशोबासाठी बाहेर काढले आणि कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर हात धुवून घेतले.' 
 
 
एकही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही
आम्ही सुद्धा कर्जमाफीची अंमलबजावणी करत आहोत. त्यामुळे, आमच्यावर ती योग्यपणे लागू करण्याची मोठी जबाबदारी आहे. यात कर्जबाजारी, गरीब आणि गरजवंत शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ होईल याची खात्री करून घेतली जाणार आहे. कर्जमाफीचा लाभ गरजू शेतकऱ्यांनाच मिळत असल्याची खात्री त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करून घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पुढील तीन महिन्यात आम्ही त्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
 
बातम्या आणखी आहेत...