आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅँक ग्राहकांना लुटणारी गुजरातमधील टोळी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बॅँकांमधून मोठी रक्कम काढणा-या ग्राहकांवर लक्ष ठेवून त्यांना लुटणारी गुजरातमधील सहा जणांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून साडेबारा लाख रुपये, साडेनऊ किलो चांदीची भांडी व सोन्याचे दागिने असा एकूण 39 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पंकज जवाहर माचरेकर (वय 31), विपुल पूनम गारंगे (37), मनोज ऊर्फ मनीष कन्हैलाल सेवानी (32), राजू कमेटिया गागडेकर (57), नीलेश फतीया भोगेकर (35) व जगदीश अनुसिंग राठोड (35, सर्व रा. अहमदाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून झायलो व युनिकॉर्न गाडीही जप्त करण्यात आली. बॅँकेतून पैसे काढून बाहेर पडणा-या ग्राहकांचा पाठलाग करून लुटणे, ही या टोळीची मोड्स ऑ परेंडी होती. बुधवारी निगडी येथील एचडीएफसी बॅँकेजवळ हे आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून सहा जणांना अटक केली.
जामिनावर सुटताच टोळी
टोळीचा सूत्रधार पंकज याला ऑक्टोबर 2010 मध्ये नऊ साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्याला सात वर्षे तुरुंगवासही झालेला आहे. मात्र सध्या तो जामिनावर सुटलेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नवीन टोळी तयार करून त्याने पुन्हा कारवाया सुरू केल्या होत्या. औरंगाबाद, बीड, अहमदनगर या जिल्ह्यातही त्याने गुन्हे केले आहेत.