आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : बंदुकीच्‍या धाकावर सराफा दुकानात दरोडा, पाहा पुण्‍यातील थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील काळेवाडी बाजारपेठ. दिवाळीच्‍या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. त्‍यासाठी व्‍यापाऱ्यांची होत असलेली धावपळ. अशातच एका सराफा दुकानात तीन व्यक्ती आल्या नि सोने गहाण ठेवण्‍याच्‍या बहाणा करून बंदूक आणि चाकूच्‍या धाकावर दुकान लुटण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, दुकानदाराने आरडा- ओरडा करताच आजूबाजूचे व्‍यापारी आले. दरम्‍यान, दरोडेखारांनी व्‍यापाऱ्यावर चाकू हल्ला करून दागिने तिथेच सोडून पळ काढला. ही घटना येथील धनगरबाबा मंदिराच्या पाठीमागे सोनी यांचे हरिओम ज्वेलर्समध्‍ये गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजताच्‍या सुमारास घडली. दिनेश भंवरलाल सोनी (वय- 32, रा. शिवशंकर कॉलनी,थेरगाव) असे जखमी व्‍यापाऱ्याचे नाव आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली.
सीसीटीव्‍ही व्‍ह‍िडिओमध्‍ये नेमके काय आहे ?
गुरुवारी सायंकाळी हरिओम ज्वेलर्समध्‍ये तीन अनोळखी इसम दुकानात आले. त्‍यांनी सोने गहान ठेवण्याचा बहाना केला. त्यानंतर त्यांनी दुकानाचे सेटर ओढून घेत सोनी यांना बंदुकीचा व तलवारीचा धाक दाखवला आणि एका दरोडेखोरांनी सोनी यांच्या डोक्यात चाकूने वार केले. त्यामुळे सोनी यांनी आरडाओरड केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारचे दुकानदार तेथे आले व त्यांनी दुकानाचे सेटर उघडले. त्यामुळे चोरटे गडबडले व लुटीचा सर्व माल तेथेच टाकून त्यांनी पळ काढला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा सीसीटीव्‍ही फुटेजचे फोटोज..