आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीनावर बाहेर आलेल्या गुंड कुणाल पोळची निर्घृण हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शहरातील मध्यवर्ती भागातील स्वारगेटजवळ शंकरशेठ रोडवर सेव्हन लव्ह्ज चौकातील सम्राट हॉटेलमध्ये गुंड कुणाल पोळ याची काल रात्री उशीरा निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री साडेबाराच्या सुमारास 10-12 लोकांच्या टोळक्याने पोळकर गोळीबार केला. त्यात कुणाल पोळचा जागेवरच मृत्यू झाला.
कुणाल पोळवर शहरातील विविध ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू होती. सध्या तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. काल रात्री कुणाल सम्राट हॉटेलच्या मालकाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे 4-5 सहकारीसुद्धा होते. मात्र, त्याचवेळी पोळवर पाळत ठेवली होती. कुणाल हॉटेलमध्ये गेल्यावर दबा धरून असलेल्या हल्लेखोरांनी हॉटेलच्या बाहेर आले. त्यावेळी कुणाल हॉटेल मालकाशी बोलत होता. त्याचवेळी अचानक 10-12 च्या जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. पोळवर 10-15 गोळ्या घातल्या गेल्या. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
गुंड टोळींच्या परस्पर वादातून कुणालची हत्या झाली असावी अशी शंका पोलीस व्यक्त करत आहेत. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी शहर पोलिस दलातील बडे अधिकारी दाखल झाले होते.