आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुण्यात श्रीमंत दगडूशेठ व कसबा गणपतीची आरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात श्री श्री रविशंकर यांनी पुण्यात हजेरी लावली. - Divya Marathi
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात श्री श्री रविशंकर यांनी पुण्यात हजेरी लावली.
पुणे- पुणे आणि पंचक्रोशीतील भाविकांची एकच गर्दी... प्रत्येकजण ओझरते दर्शन घेण्यासाठी आसुसला होता. निमित्त होते आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते होत असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या आरती सोहळ्याची...
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात श्री श्री रविशंकर यांनी पुण्यात हजेरी लावली आणि बाप्पांची आरती केली. हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांच्या समवेत हजारो समुदायाने गणपतीची आराधना केली.

यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले, गणपती ही विद्येची देवता आहे. गणपती हा प्रत्येकाचा अधार आहे. प्रत्येक कार्याचा पाया आहे. कोणताही पाया पक्का असला तर इमारतीला कोणीही धक्का लावू शकत नाही म्हणूनच गणपतीची आराधना करुन पाया पक्का केल्यास जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. गणपती बाप्पा हा आनंद देणारा आणि मंगलमय आहे. म्हणूनच आपण सर्वजण विघ्नहर्त्या गजाननाचा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो.
दरम्यान, कल्याणीनगर येथे झालेल्या सत्संग सोहळ्यात सुमारे 20 हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले होते. या सोहळ्यात श्री श्री रविशंकर यांनी गणरायाची महती विषद केली. गणपती, त्याची आयुधे यांचे वैशिष्ठ त्यांनी विषद केले. विद्येची देवता असणारा गणपती आपणास त्याच्या आराधनेने बुध्दी देतो पण, ती प्राप्त करण्यासाठी आपली भक्तीही तितकीच सक्षम असली पाहिजे, असे ते म्हणाले. आपण संवेदशशील असले पाहिजे, नकारात्मक भावना अथवा भीती भगवंताच्या केवळ नामस्मरणाने दूर होते, तसा प्रयत्न तुम्ही नक्की करुन बघा, असे श्री श्री म्हणाले.
यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, आमदार जगदीश मुळीक, योगेळ मुळीक तसेच पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, श्री श्री रविशंकर यांच्या पुणे भेटीची छायाचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...