आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guruvanand Swami Magic Chain To Cm Wife Amruta Fadanvis

CM फडणवीसांच्या पत्नीस बाबाने जादूने दिली चेन, अमृता म्हणाल्या,चमत्कारांवर विश्वास नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना हवेतून हात फिरवत साखळी भेट देताना स्वामी गुरुवानंद. - Divya Marathi
पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना हवेतून हात फिरवत साखळी भेट देताना स्वामी गुरुवानंद.
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पुण्यातील कार्यक्रमात एका महाराजाने हवेतून काढून दिलेल्या ‘साखळी’चा प्रसाद स्वीकारल्याचे समाेर अाले अाहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा असूनही दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनेच अशा कार्यक्रमांना जाऊन ‘प्रसाद’ स्वीकारण्यावरून नवा वाद उद््भवण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ‘चमत्कार सिद्ध करा व २१ लाख रुपये मिळवा’ असे अाव्हान देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराविराेधात दंड थाेपटले अाहेत.

पुण्यातील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गुरुवानंद स्वामी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनाही बँकिंग क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अमृता यांना भजन गाण्याचा आग्रह झाला म्हणून त्यांनी एक भक्तिरचना सादर केली. ती गाऊन परत येताना बाबांना त्यांनी नमस्कार केला. तेव्हा बाबांनी हवेत हात फिरवून अमृता यांना एक साखळी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संबंधित बाबावर सरकारने जादूटाेणाविराेधी कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी केली अाहे.
चमत्कारांवर विश्वास नाही : अमृता फडणवीस
ते (स्वामी) माझ्या आजोबांच्या वयाचे होते. त्यामुळे त्यांना आदराने नमस्कार केला. त्यांनी स्वत:हून मला आशीर्वादासाठी बोलावले. मी वाकून नमस्कार करत असल्यानंतर त्यांनी मला साखळी दिली. त्यात काहीही चमत्कार नव्हता. कारण त्यांच्या हातात आधीपासून साखळी होतीच. मी तर्कशुद्ध विचारांची व्यक्ती असून चमत्कारांवर माझा विश्वास नाही.
- अमृता फडणवीस
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो