आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ जुलैला निघणार पालखी, अधिक मासामुळे पालखी सोहळा लांबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लक्षावधी भाविकांच्या जिव्हाळ्याचा संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा नऊ जुलैपासून सुरू होणार आहे. आळंदी देवस्थान आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्यातील चर्चेनंतर सोहळ्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

यंदा अधिक मास असल्याने हा ‘वारी सोहळा’ नेहमीपेक्षा लांबणार आहे. त्यातच काही खासगी पालखी सोहळेकऱ्यांनी पालखी सोहळ्याविषयी उलटसुलट पत्रके प्रसिद्ध केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर विश्वास ठेवू नये, असे अावाहन पालखी सोहळाप्रमुख बाळासाहेब आरफळकर यांनी केले. यंदा आळंदीला एकच मुक्काम असेल. गांधीवाड्यात ९ जुलैला पहिला मुक्काम राहील. १० जुलैला सोहळा दाेन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

असे असेल नियोजन
९ जुलै पालखीचे प्रस्थान (मुक्काम आळंदीत)
१० जुलै पुण्यात मुक्काम
१२ जुलै सासवड
१४ जुलै जेजुरी
१५ जुलै वाल्हे (दोन दिवस मुक्काम)
१८ जुलै लोणंद-ताडगाव
१९ जुलै फलटण
२० जुलै बरड
२१ जुलै नातेपुते
२२ जुलै माळशिरस
२३ जुलै वेळापूर
२४ जुलै भंडीशेगाव
२५ जुलै वाखरी
२६ जुलै पंढरपूर

पंढरपूर येथे पाच दिवसांचा आषाढी सोहळा साजरा करून एक ऑगस्टला परतीच्या प्रवासाला सुरवात.