आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार ह. मो. मराठे यांचे पुण्यात निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- धारदार लेखणीद्वारे मराठी साहित्यविश्वात वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार हनुमंत मोरेश्वर तथा ह. मो. मराठे (७७) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर पत्नी अरुणा यांनी अंत्यसंस्कार केले. हमोंच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.   

हमोंचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. कोल्हापूरला त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आणि काही काळ त्यांनी तिथेच प्राध्यापकी केली. पुढे लेखन, संपादन, पत्रकारिता या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांची पहिली लघुकादंबरी ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ व दुसरी लघुकादंबरी ‘काळेशार पाणी’ ही ‘साधना’च्या दिवाळी अंकात १९६९ व १९७० मध्ये प्रसिद्ध झाली. महानगरीय उद्यमशील विश्वाचे हमोंनी घडवलेले दर्शनही वेगळेपण जपणारे आहे. सध्या गाजत असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक हमोंच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे.  लेखनासोबत हमोंची पत्रकारितेतील कारकीर्दही बहरली. किर्लोस्कर, स्त्री, लोकप्रभा, मार्मिक, नवशक्ती आदी नियतकालिकांत त्यांनी पत्रकारिता केली.संबंधित.
 
हमोंची साहित्यसंपदा-
 
अण्णांची टोपी (कथासंग्रह)
आजची नायिका (उपरोधिक)
इतिवृत्त
इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)
उलटा आरसा (उपरोधिक)
एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)
कलियुग
काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)
घोडा
चुनाव रामायण (व्यंगकथा)
ज्वालामुख (कथासंग्रह)
टार्गेट
द बिग बॉस (व्यंगकथा)
दिनमान (उपरोधिक लेख)
देवाची घंटा
न लिहिलेले विषय (वैचारिक)
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)
न्यूज स्टोरी
पहिला चहा (भाग १, २). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.
पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा २रा भाग)
प्रास्ताविक
बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)
बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)
मधलं पान (लेखसंग्रह)
मार्केट (१९८६)
मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)
युद्ध
लावा (हिंदी)
वीज (बाल साहित्य)
श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
सॉफ्टवेअर
स्वर्गसुखाचे package (विनोदी)
हद्दपार
ह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)
पुस्तिका संपादन करा
आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी
गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ
ब्राह्मण चळवळ कशासाठी?
ब्राह्मणनिंदेची नवी लाट
ब्राह्मणमानस
ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (२००४)
विद्रोही ब्राह्मण
.... शिवधर्म...
संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?
बातम्या आणखी आहेत...