आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणरणत्या उन्हाचा सामना केल्यावर राज्यात काही ठिकाणी गारपीट; अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे: रणरणत्या उन्हाचा सामना केल्यावर राज्याच्या काही भागांत शनिवारी पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. मात्र गारा व पावसाचे स्वरूप स्थानिक होते. पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि परिसरातही दुपारी पाऊस पडला. राज्यात उर्वरीत ठिकाणी हवामान कोरडे होते. येत्या ४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला.  
 
शनिवारी अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर मात्र लख्ख ऊन पडले. येत्या दोन दिवसांतही ढगाळ हवेचा प्रभाव दिवसाच्या पूर्वार्धात राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. राज्यात शनिवारी सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४५.१ अंश इतके नोंदले गेले. औरंगाबाद ३९, नाशिक ३८.१, सोलापूर ४१.५, जळगाव ४१.४, पुणे ३८.३, सांगली ४०, सातारा ३९, उस्मानाबाद ४०.७, परभणी ४१.६, बीड ४१.४, अकोला ४२.६, अमरावती ४०.२.
बातम्या आणखी आहेत...