आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamid Dabholkar Demands Inquiry Under Courts Observation

कोर्टाच्या नियंत्रणाखाली चौकशी करा, डॉ. हमीद दाभोलकर याचिका दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे(अंनिस) संस्थापक डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीअाय) हा तपास हस्तांतरित झाला. हत्येच्या घटनेला २२ महिने उलटूनही तपासात प्रगती नसल्याने न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास करावा, याबबत मुंबई उच्च न्यायालयात पुढील अाठवड्यात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती डाॅ.हमीद दाभाेलकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांची २० अाॅगस्ट २०१३ राेजी त्यांच्यावर दाेन अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळीबार करून हत्या केली. त्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत होऊनही त्यात काेणतीही प्रगती झालेली नाही.

घटना पुण्यात, तपास अधिकारी मुंबर्इत
पुण्यात घडलेल्या या घटनेचा तपास सीबीअाय अधिकारी मुंबर्इत बसून तपास करत आहेत. सीबीअाय अधिकारी स्वत:हून अाम्हास काेणतीही माहिती देत नसल्याची तक्रार डाॅ. दाभाेलकर कुटुंबीयांच्या वतीने सातत्याने केली जात अाहे. राज्यात जादूटाेणा कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी तसेच जातपंचायतविराेधी कायदा तातडीने मंजूर व्हावा अशी मागणी अंनिसचे करत आहे. मात्र, शासन याप्रकरणी उदासीन अाहे. या परिस्थितीतही अामचा लढा सुरूच राहील असेे डाॅ. हमीद म्हणाले.