आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माझ्या बायकोचे अनैतिक‍ संबंध आहेत तिला फाशी द्या\', चैतन्‍यच्‍या वडिलांची आर्त मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राखी बालपांडे. - Divya Marathi
राखी बालपांडे.


पुणे - उच्चशिक्षि‍त आईने 13 वर्षाच्या मुलाला बॅटने मारहाण करून हत्या केल्याची घटना 5 ऑगस्‍टला शहरात घडली होती. अपंग असलेला मुलगा कायम घरातच राहत असल्याने अनैतिक संबंधाला अडसर येत होता. त्‍यामुळे आईने हे कृत्‍य केलाचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. राखी तरूण बालपांडे (वय 36 ) असे आरोपी महिलेचे नाव आहे तर चैतन्य तरूण बालपांडे (13, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्‍यान, 'माझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत. त्‍याला चैतन्‍य अडसर ठरत होता. त्‍यामुळेच तिने त्‍याचा खून केला. तिला फाशी द्या', अशी प्रतिक्रिया चैतनचे वडील तरुण बालपांडे यांनी दिली.
अनैतिक संबंधातून नाही तर विम्‍यासाठी केली हत्‍या; राखीची कबुली
पोटच्‍या पोराचा खून करून कैदासीन झालेल्‍या राखीने आज (बुधवार) आपल्‍या गुन्‍ह्याची कबुली दिली असून, दोन लाख रुपयांच्‍या विम्‍यासाठी आपण हे कृत्‍य केल्‍याचे ती म्‍हणाली.
नेमके काय आहे प्रकरण
राखी बालपांडे ही गेल्या दोन वर्षापासून विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात गेल्या दोन वर्षापासून आपली आई, बहीण आणि मुलासह राहत होती. दरम्‍यान, तिचे प्‍लॅट मालक अमित मोरे याच्‍यासोबत अनैतिक संबंध प्रस्‍तापित झाले. खी मूळची नागपूरची असून, तिचे तिच्या नव-याशी पटत नाही. त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, दोन वर्षापूर्वी राखी पुण्यात आल्यानंतर चैतन्यला पुणे एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकले होते. गेल्या दोन वर्षापासून ती त्याचा चांगला सांभाळ करत होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ती चैतन्यला मारहाण करायची. तसेच आता तो सातवीला गेला होता. मात्र, राखीने अचानक त्याचे शाळेत जाणे बंद केले. चैतन्य पायाने अपंग होता. त्यामुळे यापूर्वी राखी त्याची काळजी घ्यायची. मात्र, मागील काही दिवसापासून त्याला घरात कोंडीत असे. त्याला उपाशी ठेवून त्याचा मानसिक छळही करीत होती.

दोन महिन्यापूर्वी राखीच्या बहिणीचे लग्न झाले व ती मुंबईला राहायला गेली. तेव्हापासून राखी ही तिची आई व चैतन्यसह राहत होती. मागील आठवड्यात आईचे व राखीचे भांडण झाले. त्यामुळे आई नागपूरला आठ दिवसापूर्वी निघून गेली होती. दरम्यान, या काळात राखीच्या घरी सुमि‍त व त्याच्या दोन मित्राचे सारखे येणे-जाणे होते. राखी व सुमि‍त यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे शेजा-यांचे म्हणणे आहे. मुलगा चैतन्य आता 13 वर्षाचा म्हणजेच मोठा होऊ लागल्याने राखीला त्याची अडचण होऊ लागली. त्यातच तो अपंग असल्याने कायम घरातच राहायचा. राखी व सुमि‍तला चैतन्य अडसर ठरू लागला. त्यामुळे मागील आठ दिवसापासून राखीसह सुमित व त्याचे मित्र त्याला मारहाण करीत होते अशी माहिती शेजा-यांकडून पुढे येत आहे. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
चैतन्यला सुमित व त्याच्या मित्रांनीच दवाखान्यात दाखल केले होते. त्यावेळी तो बाथरूममध्ये पडल्याचे सांगितले गेले होते. मात्र, मंगळवारी राखी व सुमितने त्याला बॅटने मारहाण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री चैतन्यला मारहाण करून राखी ऑफिसला गेली होती. त्यानंतर ती तुळशीबागेतही खरेदी गेली होती. बुधवारी सायंकाळी सुमीत व राखी बचाव करण्यासाठी वकिलाकडे गेल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राखी बालपांडे, तिचा प्रियकर व घरमालक सुमीत मोरे यांनी चैतन्य याला कट करून मारल्याचा संशय व्‍यक्‍त‍ केला जात आहे. राखी बालपांडे ही उच्चशिक्षीत असून वाकड येथे एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत आहे. मात्र, आपण ही हत्‍या अनैतिक संबंधातून नाही तर विम्‍याच्‍या रक्‍कमेसाठी केल्‍याचे तिने कबूल केले आहे.
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...