आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरडीखाली अडकलेल्याच्या मदतीला \'तो\' धावला अन् काळाने घात केला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ मोठी दरड कोसळल्याची बातमी त्याच्या कानावर पोहचली. तीन जण जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी त्याला सांगितल्यावर तो नेहमीप्रमाणेच तत्परतेने मदतीसाठी धावला पण दरडीखाली अडकलेल्यांना वाचविण्यासाठी जात असताना त्याला खोपोलीजवळ अज्ञात एका वाहनाने जोरदार धडक दिली व तो खाली कोसळला. त्याच्यासमवेत असलेल्या इतरांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
गणपत पांडुरंग कुडपाने (वय- 32, रा. गोळेवाडी, खालापूर) असे या तरूणाचे नाव आहे. याबाबतची घठना अशी की, एक्सप्रेस वेवर काही अपघात घड़ल्यास या परिसरातील अनेक तरूण मदतीला धावतात. दरड कोसळल्यानंतरही काही तरूण मदत करीत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे जाणा-या अज्ञात स्विफ्ट कारने धडक दिली. या तरूणासमवेत अग्निशमन दलाचा एक जवान व एक पत्रकार जखमी झाला आहे. या अपघातातून खोपोलीचे पोलिस निरीक्षक जयसिंह तांबे हे थोडक्याच बचावले. दरम्यान, कालच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. रविवारी सकाळी दरड कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत.
पुढे पाहा, यासंबंधातील माहिती....
बातम्या आणखी आहेत...