आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजाला योग्य दिशा दाखविणा-या पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ. निखील हिरेमठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करताना हॉस्पिटलमधील डॉक्टर...... - Divya Marathi
पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करताना हॉस्पिटलमधील डॉक्टर......

पुणे- लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांवर समाजाला चांगली दिशा दाखवणे, समाजातील वाईट प्रवृत्तींची कृत्ये समाजासमोर आणण्याचे जबाबदारीचे काम असते. त्यामुळे ही जबाबदारी पेलण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असावे, यासाठी त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करुन काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत चिंचवड येथील सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. निखिल हिरेमठ यांनी व्यक्त केले.

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चिंचवड, पवनानगर येथील सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलमध्ये पत्रकार आणि त्यांचे कुटूंबियांसाठी वेगवेगळ्या आरोग्य तपासणी शिबिराचे गुरुवारी आयोजन केले होते. या शिबीरास पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी चांगला प्रतिसाद दिला.या शिबीरात ईसीजी, रक्तशर्करा आणि थायरॉड या आजारासह इतरही तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन तसेच औषधोपचार देण्यात आले. यावेळी पत्रकारांना आरोग्याविषयी वेगवेगळ्या डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

 

मल्टिस्पेशालिस्ट असणार्‍या या सर्व सोयीयुक्त रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबीरास हॉस्पिटलचे डॉ. हिरेमठ, डॉ. अर्चना कुडे, डॉ. मोहिनी मांजरे, अशोक सेन, जशनजीत सिंग, मनोज मेनन,  गुरुजित कौर, शुभांगी पोळ, शिल्पा जोशी, हरविंदर सिंग यांचे सहकार्य लाभले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हेमंत जाधव, कार्यकारिणीचे सदस्य सुकृत मोकाशी, अमोल येलमार उपस्थित होते. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित अधिक माहिती...

बातम्या आणखी आहेत...