आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Forecast Possible Through Gentics Map, C DAC Research

जन्मताच कळणार आरोग्य कुंडली, सी-डॅकचे संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भावी आयुष्यातील माणसाचे आरोग्य कसे राहील, हे त्याच्या जन्मावेळीच जाणून घेता यावे याबाबतचा ‘जनुकीय नकाशा’ तयार करण्याचे काम सी-डॅकच्या (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग)बायोइन्फर्मेटिक्स विभागाकडून केले जात आहे. या माध्यमातून विशेषत: कर्करोगावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे सहसंचालक आणि विभागप्रमुख डॉ. राजेंद्र जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कर्करोगाचे संकट जगभर घोंगावत असल्याने आम्ही कर्करोगावरील संशोधनाला अग्रक्रम दिला आहे, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले, सध्या संस्थेत हे संशोधन एकूण चार स्तरांवर सुरू आहे. पहिला टप्पा ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधांवर आधारित आहे. नेमक्या कोणत्या औषधांमुळे व्यक्तीच्या जनुकांमध्ये नेमके कोणते बदल घडतात, याचा अभ्यास या संशोधनातून केला जात आहे. दुस-या स्तरावरील संशोधनात कर्करोगाचे मूळ कारण शोधण्याचे काम
सुरू आहे.

संशोधनाचा तिसरा टप्पा ‘रिपर्पज ड्रग’ स्वरूपाचा आहे. ज्यातून एकच औषध अन्य कोणत्या रोगावर उपयोगी पडू शकेल का, याबाबतचा विचार केला जात आहे, तर चौथ्या टप्पा कर्करोगाचे वेळेपूर्वीच निदान करण्याचा आहे. भविष्यात बाळ जन्मताक्षणीच त्याचे भावी आरोग्य नेमके कसे राहील, त्याला कुठले आजार संभवतात, याचा नकाशा तयार होईल, असे डॉ. जोशी म्हणाले.

बायोलॉजी परिषद
जीवशास्त्र ही ज्ञानशाखा दिवसेंदिवस अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित होऊ लागली आहे. विशेषत: जनुकीय संरचना समजून घेण्यासाठी अति अद्ययावत संगणकीय प्रणालींची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सी-डॅकच्या वतीने २० ते २२ जानेवारीदरम्यान ‘बायोलॉजी कॅटलायझिंग इव्होल्युशन’ ही विशेष परिषद आयोजित केली आहे. जनुकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयातील जगभरातील तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सी-डॅकचे महासंचालक रजत मुना यांनी दिली.

औषधांचा अभ्यास
सध्या जगात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या रोगाचे मूळ कारण शोधण्याबरोबरच त्यावर प्रभावी ठरेल असे औषध संशोधित करण्यावर ‘सी- डॅक’चा भर राहणार असाल्याचे डॉ. जोशी म्हणाले.