आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण वयात हृदयविकारांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आरामदायी जीवनशैली, चुकीचा आहार-विहार आणि तणावग्रस्तता यामुळे देशातील हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, 30 ते 45 वर्षे वयोगटातील पुरुष व स्त्रिया या विकारांना बळी पडत आहेत, असे धक्कादायक वास्तव इंडस हेल्थ प्लस या आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये 40 नंतरच्या स्त्रियांचे प्रमाणही मोठे असल्याचे निदर्शनास आले आहे.

वर्ल्ड हार्ट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जगभरात हृदयाशी संबंधित आजारांविषयी आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी जगजागृती केली जाते.

या दिवसाचे औचित्य साधून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या इंडस हेल्थ प्लस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात उपरोक्त धक्कादायक निष्कर्षसमोर आले आहेत. हृदयविकारांविषयी युवा वर्ग आणि महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जाणीव-जागृतीची आवश्यकता आहे, असे मत इंडस हेल्थचे सहव्यवस्थापकीय संचालक अमोल नायकवडी यांनी व्यक्त केले.

सतत बैठे काम (कार्यालय, दूरचित्रवाणी संच), खाण्याच्या चुकीच्या सवयी (जंक फूडचे वाढते प्रमाण, फायबरयुक्त आहारघटकांचा अभाव, वेळी-अवेळी खाणे) आणि नियमित व्यायामाचा अभाव यांच्या जोडीने सतत स्पर्धात्मक वातावरणात राहावे लागल्याने वाढत जाणारा तणाव, ही हृदयविकारांची प्रमुख कारणे आहेत. कोलेस्टेरॉलचे प्रमाणही 40 ते 50 या वयोगटातील महिला व पुरुषांमध्ये सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.मद्यपान,

>तंबाखूसेवन, जंक फूड आरोग्याचे शत्रू
>कोलेस्टेरॉलचे प्रमाण 40 च्या आसपास वाढते

आकडे देतात वास्तवाचे भान
2020 पर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक भारतीय हृदयविकारग्रस्त होण्याची शक्यता
मेनोपॉजपूर्वीही स्त्रियांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढते
40 ते 50 वयोगटांतील स्त्री-पुरुषांना सारखाच धोका
युवा वर्गातही हृदयविकारांनी पसरले हातपाय